संपर्क : 020-67475050 | ई-मेल : niraamaywellness@gmail.com

समुपदेशन

541

बहुतांशी रोगाचे मूळ कारण मनातील अयोग्य विचार हेच असते. जोपर्यंत मन:शुद्धी होत नाही, तोपर्यंत शरीराला जडलेला आजार समूळ नष्ट होत नाही. मन व शरीर परस्परक्रिया व प्रतिक्रिया करत असतात, हे सर्वमान्य तथ्य आहे. मानसिक व्याधींमुळे शारीरिक रोग उत्पन्न होतात, तसेच याउलटही होते. जवळजवळ सर्व रोगांचे मूळ मन हेच आहे. ‘मला सर्दी होऊ शकते किंवा अमुक एक व्याधी होऊ शकते’, असे आपले विचार आपल्या शरीराला त्या रोगजंतूंच्या स्वागतासाठी तयार करत असतात.

आपले मन विश्वमनचाच एक अंश आहे. त्यामुळे कोणताही संकल्प (दृढ विचार) मनात उत्पन्न झाला की क्षणार्धात तो विश्वभर संचार करीत असतो. आपण उच्चारलेला प्रत्येक शब्द, केलेली कृती, मनात आलेला प्रत्येक विचार लगेच विश्वावकाशात चित्रित केला जातो आणि म्हणूनच लक्षावधी मैल दूर असणार्‍या माणसांचे विकार केवळ प्रार्थनेने दूर करता येतात. संकल्प ही प्रचंड स्थिर, चल जगताला व्यापून उरणारी शक्ती आहे. संकल्प जितका बलवान, तितकी तुमची प्रार्थना सफल होते.

आपल्या संस्कृतीने प्रत्येक घटनेला, वस्तूला पावित्र्य, मांगल्य दिले. सुंदर प्रथा शिकविल्या. सुसंस्कृत व कृतज्ञ बुद्धीने सर्वांकडे पाहायला शिकविले. या सगळ्यातून विश्वास व श्रद्धेमुळे प्रचंड मनोधैर्य माणसात निर्माण होत असे. यामुळे संकटांचा सामना माणूस सहजपणे करू शकत असे. आज मात्र चहाच्या पेल्यातील वादळानेसुद्धा माणसे कोलमडतात. कोणताही रोग हा फक्त शरीरातील बिघाड नसून मनाचा कमकुवतपणा तसेच चैतन्यशक्तीचा र्‍हास याचाच परिपाक असतो.

स्वयंपूर्ण उपचारपद्धतीमध्ये रुग्णाच्या मानसिकतेचा अभ्यास केला जातो आणि त्यानुसार मनाची सकारात्मकता वाढविण्यासाठी व खोलवर गेलेल्या दुःख भावना समूळ नष्ट करण्यासाठी त्याला समुपदेशन केले जाते. यामुळे मनाची ताकद वाढून भविष्यात कोणतेही संकट अथवा दुःख सहन करणे व त्यास खंबीरपणे तोंड देणे सहज शक्य होते.

निसर्गोपचार
संपूर्ण सृष्टी (निसर्ग) ही पंचतत्त्वांपासून बनलेली आहे. मनुष्यप्राणी हाही निसर्गाचाच एक … अधिक माहिती
मुद्रा शास्त्र
आपल्या हाताची पाच बोटे पाच तत्त्वांचे प्रतिनिधित्व करत असतात. अग्नितत्त्वाचे प्रतिनिधित्व … अधिक माहिती
अक्षरब्रह्म
अक्षरब्रह्म किंवा नादब्रह्म हा आणखी एक महत्त्वपूर्ण विषय आहे. आपल्या वर्णमालेतील … अधिक माहिती
नाडी/चक्र शुद्धी
स्वयंपूर्ण उपचारपद्धतीमधील हे एक महत्त्वाचे अंग असून याद्वारे संपूर्ण दोषनिवारण केले जाऊ … अधिक माहिती
हिपजॉइंट्सच्या त्रासातून पूर्ण बरी झाले - सौ. लक्ष्मी गरकळ

टी.बी.साठी घेतलेल्या औषधांच्या दुष्परिणामांमुळे माझी हाडे व स्नायू कमकुवत झाले होते. मला चालायला खूपच त्रास होत होता, पाय ओढतच चालावे लागत होते. माझ्या पायाला नुसतं कोणी स्पर्श जरी केला तरी असह्य वेदना होत होत्या. त्यासाठी हाडांच्या स्पेशालिस्टकडे गेलो. हिप जॉईन्ट बॉल भोवतीचे वंगण संपल्यामुळे ती घासली जात आहे व त्यामुळेच चालायला त्रास होत आहे असे निदान झाले. त्यानंतर संचेतीला 2 वर्षे ट्रीटमेंट घेतली. त्रास तर कमी झाला नाही. कोठारी हॉस्पिटल झाले. सिटीप्राईड झाले. आयुर्वेदिक ट्रीटमेंटची तर गणनाच नाही. कितीतरी कडू औषधे मी सतत घेत होते.

शेवटी ऑपरेशनशिवाय पर्याय नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ऑपरेशन केल्यावर देखील रिझल्टस् मिळतीलच याची शाश्‍वती कोणी देत नव्हते. जून 2011 मध्ये निरामयच्या विनाऔषध-विनास्पर्श उपचारांबद्दल कळले. तोपर्यंत 12 वर्षांचा वनवास मी भोगला. संपूर्ण शरीर आणि मन आजारी झाले होते. माझे रिपोर्टस् घेऊन मी सरांना भेटले. मी पूर्ण बरी होऊ शकते हा विश्वास मला तिथे मिळाला व फोनवरून ट्रीटमेंट सुरू झाली. हप्त्याभरातच मला हळू-हळू बरे वाटायला लागले. मी नियमित ट्रीटमेंट घेत होते. हळू-हळू दुखणे पूर्ण थांबले. हिप जॉईन्ट बॉल खराब झाल्यामुळे मी खूप हळू व लंगडत चालत हाते. माझी चाल हळूहळू नॉर्मल व्हायला लागली.

याच दरम्यान प्रेग्नन्सी राहिल्यामुळे काळजी वाढली. कारण खुब्यावर येणारा ताण वाढणार होता. माझा श्री. चांदोरकरांवर पूर्ण विश्‍वास होता, त्यामुळे मी स्वयंपूर्ण उपचार सुरूच ठेवले. बाळंतपणही व्यवस्थित झाले. कोणतेही त्रास आधी व नंतरही झाले नाहीत. या दरम्यान माझा हर्नियाचा त्रासही बरा झाला. टॉन्सिल्सचा त्रासही बरा झाला. त्यासाठी ऑपरेशन किंवा इतर उपचार घ्यावे लागले नाहीत. 5 मि.मी.चा किडणी स्टोन पूर्णपणे नाहीसा झाला. पित्ताशयाचे खडे विरघळून गेले आणि मी मानसिक रीत्या स्ट्राँग झाले.

आज मी संपूर्ण निरोगी आयुष्य जगत आहे निरामयमुळेच.

हि पोस्ट English (इंग्लिश) मध्ये उपलब्ध आहे


Where there are problems,  There are solutions too !
Where there is fear,  There is Courage too!
Niraamay for a healthy and happy life!
Get latest updates and exclusive information straight to your email inbox 
Stay Updated
Give it a try, you can unsubscribe anytime.