संपर्क : 020-67475050 | ई-मेल : niraamaywellness@gmail.com

मुद्रा शास्त्र

241

आपल्या हाताची पाच बोटे पाच तत्त्वांचे प्रतिनिधित्व करत असतात. अग्नितत्त्वाचे प्रतिनिधित्व अंगठा करतो, वायूतत्त्वाचे तर्जनी, आकाशतत्त्वाचे मध्यमा तर पृथ्वीतत्त्वाचे अनामिका व करंगळी जलतत्त्वाचे नियमन करते.

कोणत्याही तत्त्वाचे दुसर्‍या तत्त्वात परिवर्तन करणे, एखादे वाढलेले तत्त्व कमी करणे म्हणजेच त्याचे विघटन करणे, एखाद्या कमी असणार्‍या तत्त्वाची निर्मिती करणे व प्रत्यावर्तन करून संतुलन साधणे या चार प्रकारांमध्ये ‘मुद्रा’ कार्यरत असतात. शरीर योग्य स्थितीत आणण्यासाठी तसेच प्रफुल्लता निर्माण करण्यासाठी मुद्रांचा आधार घेतला जातो. मुद्रांचे परिणाम सूक्ष्म तंतूंवर होत असल्याने मुद्रा करताना शरीर सैल सोडणे गरजेचे असते.

शरीरातील रुधिराभिसरण सुधारणे, कफ, वात, पित्त यांचे संतुलन साधणे हे मुद्राशास्त्राच्या आधारे शक्य होते. पृथ्वीमुद्रा, वरुणमुद्रा, ज्ञानमुद्रा, आकाशमुद्रा यांसारख्या विविध मुद्रांचा वापर स्वयंपूर्ण उपचारपद्धतीत केला जातो. वेगवेगळ्या मुद्रांचे फायदे वेगवेगळ्या आजारांसाठी होतात.

निसर्गोपचार
संपूर्ण सृष्टी (निसर्ग) ही पंचतत्त्वांपासून बनलेली आहे. मनुष्यप्राणी हाही निसर्गाचाच एक … अधिक माहिती
अक्षरब्रह्म
अक्षरब्रह्म किंवा नादब्रह्म हा आणखी एक महत्त्वपूर्ण विषय आहे. आपल्या वर्णमालेतील … अधिक माहिती
समुपदेशन
बहुतांशी रोगाचे मूळ कारण मनातील अयोग्य विचार हेच असते. जोपर्यंत मन:शुद्धी होत नाही … अधिक माहिती
नाडी/चक्र शुद्धी
स्वयंपूर्ण उपचारपद्धतीमधील हे एक महत्त्वाचे अंग असून याद्वारे संपूर्ण दोषनिवारण केले जाऊ … अधिक माहिती
अनुभव आयुष्याला गती मिळाली - सौ. शिवाली सोनार

मागील चार-पाच वर्षांपासून मला गुडघेदुखीचा भयंकर त्रास होत होता. चालणे, फिरणे, अगदी घरातल्या घरात मांडी घालून बसणेही मला शक्य होत नव्हते. त्यामुळे एका अर्थी आयुष्याला खीळच बसली होती. सर्व प्रकारची औषधं घेऊन पाहिली, सर्व उपाय केले तरीही रिझल्ट शून्यच होता. मुख्य म्हणजे त्या मोठ्या-मोठ्या गोळ्या घ्यायचा मला मनस्वी कंटाळा यायचा.

असंच एक दिवस ‘निरामय’च्या डॉ. चांदोरकर यांची मुलाखत पाहण्यात आली. परंतु मी राहायला आकुर्डीला आणि ‘निरामय’ पुण्यात होतं. त्यामुळे जाणं शक्य झालं नाही. कालांतराने ‘निरामय’ची शाखा चिंचवड मध्ये सुरू झाल्याचे कळाले आणि मी लगेच त्यांना जाऊन भेटले. डॉ. चांदोरकर यांनी पहिल्या भेटीतच आजार बरा होईल, असा विश्‍वास माझ्यात निर्माण केला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे नियमित उपचार सुरू केले आणि आश्‍चर्यकारक रीत्या माझी गुडघेदुखी कमी होऊ लागली. दोन महिन्यांच्या उपचारानंतर मी पूर्ण बरी झाले. या उपचाराुंळे आयुष्य गतिमान झाल्याचे मला वाटते आहे. आज मी घरातील सर्व कामं करू शकते, बाहेर फिरू शकते. मला दिलेल्या या शक्तीसाठी डॉ. चांदोरकर यांची मी आभारी आहे.

हि पोस्ट English (इंग्लिश) मध्ये उपलब्ध आहे