संपर्क : 020-67475050 | ई-मेल : niraamaywellness@gmail.com

निसर्गोपचार

341

संपूर्ण सृष्टी (निसर्ग) ही पंचतत्त्वांपासून बनलेली आहे. मनुष्यप्राणी हाही निसर्गाचाच एक भाग आहे. आपले शरीरही याच पंचतत्त्वांपासून बनलेले असून या पाचही तत्त्वांचा समतोल आपणास सुदृढ व चैतन्यमय ठेवतो. जेव्हा यातील एखादे तत्त्व बिघडते, म्हणजेच हा समतोल ढळतो, तेव्हा आपल्या शरीरात आजार किंवा व्याधीचा शिरकाव होतो.

पंचतत्त्व : आकाश, वायू, अग्नी, जल व पृथ्वी ही पंचतत्त्वे असून, या संपूर्ण विेशाची उत्पत्ती याच पाच तत्त्वांतून झालेली आहे. याचे स्थूल गुणधर्म अनुक्रमे आकारमान, गतिशीलता, उष्णता, प्रवाहिता व स्थिरता हे असून सूक्ष्म गुणधर्म शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे आहेत.

शब्द तन्मात्रेपासून आकाश निर्माण होते. शब्द व स्पर्श या दोन तन्मात्रांपासून वायू निर्माण होतो. शब्द, स्पर्श व रूप हे तेजाचे म्हणजेच अग्नीचे गुण आहेत. शब्द, स्पर्श, रूप व रस हे जलाचे गुण आहेत आणि शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पृथ्वीचे गुणधर्म आहेत. माणसाचे शरीरही याच पंचतत्त्वांनी बनलेले आहे. आपल्या शरीरातील कान, त्वचा, डोळे, जीभ व नाक ही वरील पंचतत्त्वांशी अनुक्रमे संबंधित आहेत.

आपल्या शरीरातील अस्थी, मांस, त्वचा, नाडी व रोम हे पृथ्वीतत्त्वाच्या अधीन आहेत. शुक्र, रक्त, लाळ, मूत्र, स्वेद हे जलतत्त्वाच्या अधीन आहेत तर क्षुधा, तृष्णा, आळस, निद्रा व मैथुन हे अग्नितत्त्वाच्या अधीन असतात. वायुतत्त्वाच्या अधीन चलन-वलन, आकुंचन, प्रसरण व निरोधन असते तसेच काम, क्रोध, लोभ, मोह व भय हे आकाशतत्त्वाच्या अधीन असतात. ही पंचतत्त्वे आपल्या शरीरातील सूक्ष्म नाड्यांमधून सतत प्रवाहित होत असतात. योग्य आहार, विहार, विचार आणि व्यायाम माणसाला चिरकाल निरोगी व आनंदी ठेवतात.

स्वयंपूर्ण उपचारांतर्गत रुग्णाच्या प्रकृतीमानानुसार व आजारांनुसार आहारातील बदल सुचविले जातात, गरजेनुसार काही व्यायाम सांगितले जातात. ज्याद्वारे पंचतत्त्वांचे संतुलन साधण्यास मदत होते.

मुद्रा शास्त्र
आपल्या हाताची पाच बोटे पाच तत्त्वांचे प्रतिनिधित्व करत असतात. अग्नितत्त्वाचे प्रतिनिधित्व … अधिक माहिती
अक्षरब्रह्म
अक्षरब्रह्म किंवा नादब्रह्म हा आणखी एक महत्त्वपूर्ण विषय आहे. आपल्या वर्णमालेतील … अधिक माहिती
समुपदेशन
बहुतांशी रोगाचे मूळ कारण मनातील अयोग्य विचार हेच असते. जोपर्यंत मन:शुद्धी होत नाही … अधिक माहिती
नाडी/चक्र शुद्धी
स्वयंपूर्ण उपचारपद्धतीमधील हे एक महत्त्वाचे अंग असून याद्वारे संपूर्ण दोषनिवारण केले जाऊ … अधिक माहिती
गुडघ्याचे लिगामेंट टीयर विनाऑपरेशन बरे झाले - सौ. लतिका नरके

घरात पाणी सांडले होते आणि त्यावरून मी घसरले. गुडघ्याला थोडा मार लागला, परंतु नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष केले. नंतर बाजारात काही साहित्य आणताना घाईने चालत होते व अचानक पाय ट्विस्ट झाला. गुडघ्याला लागलेला तो मार इतका होता की, डाव्या गुडघ्याची वाटी पूर्ण सरकून मागच्या बाजूला गेली. त्यानंतर ‘एमआरआय’ काढल्यावर असे कळाले की, लिगामेंट फाटले आहे. डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास सांगितले. ठराविक कालावधीनंतर दोन ऑपरेशन्स करावी लागणार होती आणि त्यासाठी 5-6 लाख रुपये खर्च होता. शिवाय त्यानंतर मांडी घालता येणार नव्हती, फार वजन उचलता येणार नव्हतं, अशा अनेक मर्यादा येणार होत्या.

ऑपरेशनची तारीख जवळ आलेली असतानाच साम टीव्हीवर श्री. चांदोरकर सरांची मुलाखत पाहिली. लगेचच ‘निरामय’मध्ये फोन केला आणि भेट घेतली. चांदोरकर सरांनी आम्हाला धीर दिला. आम्ही ऑपरेशन करण्याचा निर्णय रद्द केला आणि ‘निरामय’चे फोनवरून उपचार सुरू झाले. जसे महिने पूर्ण होत गेले, तशी माझ्या गुडघ्यांध्ये सुधारणा होत गेली. सहा महिन्यांनी मी पूर्ववत् झाल्याचे मला जाणवू लागले. पुढचे अजून

सहा महिने ट्रीटमेंट घेतल्यावर प्रवास करणे, जास्तीची ऊठबसही मी करू लागले. कार्यामध्ये फुगड्याही घालू शकले. दरम्यानच्या काळात मी अष्टविनायक दर्शनही केले. वर्षभराच्या उपचारांनी मी पूर्ण बरी झाले. दीड वर्षानंतर काढलेल्या ‘एमआरआय‘मधे कोणतेही दोष आढळले नाहीत.

हि पोस्ट English (इंग्लिश) मध्ये उपलब्ध आहे


Where there are problems,  There are solutions too !
Where there is fear,  There is Courage too!
Niraamay for a healthy and happy life!
Get latest updates and exclusive information straight to your email inbox 
Stay Updated
Give it a try, you can unsubscribe anytime.