संपर्क : 020-67475050 | ई-मेल : niraamaywellness@gmail.com

नाडी शुद्धी आणि चक्र शुद्धी

नाडी-चक्र

स्वयंपूर्ण उपचारपद्धतीमधील हे एक महत्त्वाचे अंग असून याद्वारे संपूर्ण दोषनिवारण केले जाऊ शकते. योगशास्त्रानुसार शरीररचनेत 14 प्रमुख नाड्या असून सुषुम्ना, इडा व पिंगला या मुख्य तीन नाड्या आहेत. या सर्व नाड्या ऊर्जावहनाचे कार्य करतात. या नाड्यांमधून प्रवाहित होणारी ऊर्जा, आपले शरीर व मन सतत कार्यरत ठेवते. योगशास्त्रात सांगितलेली चक्रे ही ऊर्जेची केंद्रे आहेत. वातावरणातील ऊर्जा शोषून घेणे व शरीरातील विभिन्न अंगांकडे वितरीत करणे हे त्यांचे मुख्य काम आहे. प्रत्येक चक्र हे विशिष्ट इंद्रिये व भावनांवर नियंत्रण ठेवते व त्यांचे कामकाज सुरळीत पार पाडते.

शरीरातील सप्त चक्रे – मूलाधार चक्रामुळे अस्थी व स्नायुसंस्था, शरीरातील चेतासंस्था कार्यरत राहते. स्वाधिष्ठान चक्र हे शरीरातील मूत्राशय व प्रजनन संस्था यांवर नियंत्रण ठेवते. मणीपूर चक्राच्या आधिपत्याखाली अन्नाचे पचन, शोषण, रसोत्पादन, मल उत्सर्जन तसेच प्रजोत्पादन, श्वासोच्छ्वास, रुधिराभिसरण या अत्यंत महत्त्वाच्या क्रिया येतात. अनाहत चक्राचे नियंत्रण हृदय व फुफ्फुस या छातीतील अत्यंत महत्त्वाच्या अवयवांवर असते. विशुद्ध चक्र  घशातील सप्तपथ, श्‍वासनलिका, थायरॉईड व थायमस ग्रंथी यांवर नियंत्रण ठेवते. आज्ञा चक्राकडे मेंदू, डोळे यांचे नियंत्रण असते. तसेच अत्यंत महत्त्वाचे म्हणजे माणसाचे विचार हे आज्ञा चक्रावर अवलंबून असतात. मूळ प्रेममय स्फुरण व ऐक्याचा भाव सहस्रार चक्रामुळे प्राप्त होतो.

चुकीच्या आहार, विहार व विचारांमुळे चक्रांच्या कार्यप्रणालीत दोष निर्माण होतात, ज्यामुळे ही चक्रे व नाड्या पूर्ण क्षमतेने वातावरणातील ऊर्जा घेऊ शकत नाहीत. त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतात. स्वयंपूर्ण उपचारांद्वारे नाड्या व चक्रांमधील दोष काढून ती ऊर्जित केली जातात व शारीरिक वा मानसिक दोष समूळ नष्ट होण्यास मदत होते.

निसर्गोपचार
संपूर्ण सृष्टी (निसर्ग) ही पंचतत्त्वांपासून बनलेली आहे. मनुष्यप्राणी हाही निसर्गाचाच एक … अधिक माहिती
मुद्रा शास्त्र
आपल्या हाताची पाच बोटे पाच तत्त्वांचे प्रतिनिधित्व करत असतात. अग्नितत्त्वाचे प्रतिनिधित्व … अधिक माहिती
अक्षरब्रह्म
अक्षरब्रह्म किंवा नादब्रह्म हा आणखी एक महत्त्वपूर्ण विषय आहे. आपल्या वर्णमालेतील … अधिक माहिती
समुपदेशन
बहुतांशी रोगाचे मूळ कारण मनातील अयोग्य विचार हेच असते. जोपर्यंत मन:शुद्धी होत नाही … अधिक माहिती
चमत्कार झाला, संधिवात बरा झाला - सौ. वैशाली दिनकर

गेल्या अठरा वर्षांपासून मला संधिवाताचा त्रास होता. अनेक सांध्यांमध्ये डिफॉर्मिटी पण आलेली होती. सर्व पॅथीजचे उपचार करून बघितले परंतु कोणताही रिझल्ट मिळाला नाही. विशेषत: सांधेदुखी व गुडघेदुखीने जास्त त्रास दिला. घरातल्या घरात एक पाऊल चालणेही मला अशक्य झाले होते. पुण्यात मुलीकडे आलो, तिथे तज्ज्ञ डॉक्टरांना दाखविले. सर्व मोठ्या-मोठ्या चाचण्या केल्या परंतु ठोस असं कोणीच काही सांगितलं नाही. दरम्यानच्या काळात ‘सकाळ’ मुक्तपीठमध्ये सौ. नीलिमा रिसबुड यांचा लेख वाचला. त्यानुसार मुलीने ‘निरामय’ची चौकशी केली. मी चालू शकत नसल्याने, मुलीने तिथे जाऊन माझा फोटो दाखविला व फोनवरून उपचार सुरू झाले.

साधारण दोन महिन्यानंतर लक्षणीय फरक जाणवला व मी नियमितपणे हे उपचार घेऊ लागले. या दरम्यान मी एकदा संगमनेर ते नागपूर रेल्वेचाही प्रवास केला, परंतु विशेष त्रास झाला नाही. आता माझे दैनंदिन व्यवहार मी व्यवस्थित करू शकते. डिफॉर्मिटीमधेही फरक जाणवत आहे. डॉ. चांदोरकर हे माझ्या आयुष्यात मला मिळालेला अल्लाउद्दीनचा जादूचा दिवाच आहेत असे मला मनोमन वाटते.

हि पोस्ट English (इंग्लिश) मध्ये उपलब्ध आहे