संपर्क : 020-67475050 | ई-मेल : niraamaywellness@gmail.com

स्वयंपूर्ण उपचार

स्वयंपूर्ण’ म्हणजे प्रत्येकातील ‘स्वयं’ला पूर्णत्वाकडे नेण्याची प्रक्रिया… पूर्णत्व म्हणजे केवळ रोगमुक्ती नाही तर ती आहे आनंदाची अनुभूती. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा शरीर व मन दोन्हीही सशक्त व निरोगी असेल. या उपचारांच्या साहाय्याने स्वयंव्याधिनिवारण व स्वयंसुधारणांचा वेग वाढून व्याधिमुक्ती होते व मनाची सकारात्मकता वाढीस लागते. स्वयंपूर्ण उपचार ही औषधरहित संपूर्ण नैसर्गिक उपचारपद्धती आहे.

शारीरिक आजार बरे करण्यासाठी, मन कणखर बनविण्यासाठी आणि शरीर व मन दोन्ही चैतन्यमय ठेवण्यासाठी या उपचारांचा उपयोग होतो. स्वयंपूर्ण उपचारपद्धतीद्वारे एकाच वेळी अनेक आजारांवर उपचार करून ते दूर करता येऊ शकतात. निसर्गोपचार, योगोपचार व अनेक प्राचीन शास्त्रांपासून बनलेली ही सोपी आणि सुटसुटीत उपचारपद्धती आहे. आजाराचे मूळ शोधून, नैसर्गिकरीत्या ऊर्जेच्या माध्यमातून आजाराचे समूळ निवारण करण्याची क्षमता या उपचारपद्धतीत आहे.

माणसाचे अस्तित्व हे तीन स्तरांमध्ये आहे शरीर, ऊर्जा व मन. ऊर्जा हा शरीर व मनातील दुवा आहे. शरीरामध्ये घडणारा प्रत्येक बदल हा उर्जेमार्फतच मनामध्ये परावर्तित होत असतो, तर मनात येणारा प्रत्येक विचार उर्जेमार्फतच शरीरापर्यंत पोहोचत असतो. स्वयंपूर्ण उपचार नेमके याच ऊर्जेवर कार्य करतात. शरीर म्हणजे आपणास फक्त भौतिक शरीर माहिती असतो, परंतु या स्थूल शरीराबाहेर एक सूक्ष्म/ऊर्जाशरीरदेखील असते. या ऊर्जाशरीराने आपले संपूर्ण भौतिक शरीर व्यापलेले असते. कोणताही दोष सूक्ष्म शरीरामध्ये अडविला जातो. परंतु वारंवार होणाऱ्या आघातामुळे सूक्ष्म शरीर अशक्त होऊन त्याचा दुष्परिणाम भौतिक शरीरावर दिसू लागतो. आधुनिक वैद्यक शास्त्रात फक्त भौतिक शरीराचा विचार करून उपचार केले जातात त्यामुळे सूक्ष्म शरीरामधील दोष तसेच राहण्याची शक्यता असते. स्वयंपूर्ण उपचार त्या ऊर्जादेहातील दोष घालवण्यासाठी कार्यरत असतात ज्यामुळे रोगाचे समूळ उच्चाटन होऊ शकते.

स्वयंपूर्ण उपचारांमध्ये समाविष्ट शास्त्र

निसर्गोपचार
संपूर्ण सृष्टी (निसर्ग) ही पंचतत्त्वांपासून बनलेली आहे. मनुष्यप्राणी हाही निसर्गाचाच एक … अधिक माहिती
मुद्रा शास्त्र
आपल्या हाताची पाच बोटे पाच तत्त्वांचे प्रतिनिधित्व करत असतात. अग्नितत्त्वाचे प्रतिनिधित्व … अधिक माहिती
अक्षरब्रह्म
अक्षरब्रह्म किंवा नादब्रह्म हा आणखी एक महत्त्वपूर्ण विषय आहे. आपल्या वर्णमालेतील … अधिक माहिती
समुपदेशन
बहुतांशी रोगाचे मूळ कारण मनातील अयोग्य विचार हेच असते. जोपर्यंत मन:शुद्धी होत नाही … अधिक माहिती
नाडी/चक्र शुद्धी
स्वयंपूर्ण उपचारपद्धतीमधील हे एक महत्त्वाचे अंग असून याद्वारे संपूर्ण दोषनिवारण केले जाऊ … अधिक माहिती
मृत्यूची भेट अन् पुनर्जन्म! - श्री. मोरेश्‍वर कुलकर्णी

आमचे आयुष्य नेहमीप्रमाणे चालू होते आणि अचानक एक दिवस असा आला की, सर्वच विस्कळित झाले. तो दिवस होता 1 जुलै 2014. नेहमीप्रमाणेच त्यादिवसाचीही सुरुवात झाली, माझी पत्नी, सौ. वर्षा आंघोळीला गेली होती आणि अचानक तिला इलेक्ट्रॉनिक हीटरचा शॉक बसला व ती बेशुद्ध पडली. बेशुद्ध अवस्थेत असताना तो हीटर तिच्या हातातच होता व त्यावेळी तिला उलटीही झाली. अथक परिश्रमाने तिला बाहेर काढल्यानंतर आम्ही तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. ‘बेशुद्ध अवस्थेत उलटी झाल्याने फुफ्फुसाचा संसर्ग होण्याची शक्यता असून, यांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे,’ असे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले.

एकीकडे डॉक्टरांचे प्रयत्न आणि दुसरीकडे देवाकडे प्रार्थना असे चालू

असताना वर्षाला तब्बल दहा दिवसांनी शुद्ध आली. हातापायाची हालचाल होत होती, परंतु फुफ्फुसाचा संसर्ग वाढतच गेला. सिटीस्कॅन केल्यावर असे लक्षात आले की, तिला न्युोनिया झाला असून त्यामुळे फुफ्फुसाला छिद्र पडले आहे. सोबतच ताप वाढणे, बीपी व पांढर्‍या पेशी कमी होणे हे प्रकार चालूच होते. ती अक्षरश: मरणाच्या दारातच उभी होती. परंतु मी आशा सोडली नव्हती. अशातच माझ्या मित्राकडून ‘निरामय’संदर्भात कळाले, तिथे संपर्क साधला. परंतु ‘निरामय’चे उपचार घेण्याची माझ्या पत्नीची क्षमता नव्हती.

मग डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वर्षाचा फोटो पाठवून तिच्यासाठी मी स्वत: ट्रीटमेंट घेऊ लागलो. 15 जुलैपासून तिच्यावर उपचार सुरू झाले आणि आश्‍चर्य म्हणजे त्याच दिवसापासून तिच्या अवस्थेत चांगला फरक पडत गेला. जशी जशी ही ट्रीटमेंट तिच्यावर होत गेली, तसे-तसे तिचे आजार कमी होऊ लागले. तापाचे प्रमाण कमी झाले, बीपी व पांढर्‍या पेशी नियंत्रणात आल्या. एवढेच नाही तर फुफ्फुसाचा संसर्गही कमी होत होता. तिच्या तब्बेतीमध्ये सुधारणा झाली परंतु घरी परत आल्यानंतरही तिला श्‍वास घेण्यास त्रास होत होता. पुढे ‘निरामय’चे उपचार चालूच ठेवले आणि एक दिवस असा आला की तिला होणारा श्‍वासाचा त्रासही पूर्णपणे बंद झाला. आता ती पूर्णपणे बरी झाली असून तिला कोणत्याही औषधांची सध्या आवश्यकता नाही.

दैवी चमत्कार आणि ‘निरामय’च्या उपचारपद्धतींमुळे हे अविश्‍वसनीय, अनाकलनीय व अद्भुत असे काहीतरी घडले. यासाठी मी ‘निरामय’चा शतश: आभारी आहे.

हि पोस्ट English (इंग्लिश) मध्ये उपलब्ध आहे


अल्झायमरवरही होऊ शकतो उपचार...

World Alzheimer's Day - Monday, 21 September
विना औषध, विना स्पर्श दिल्या जाणाऱ्या ऊर्जा उपचार
READ FULL ARTICLE