संपर्क : 020-67475050 | ई-मेल : niraamaywellness@gmail.com

स्वाधिष्ठान / काम चक्र

स्वाधिष्ठान / काम चक्र

Sex Chakra

स्वाधिष्ठान चक्र लिंगस्थानाजवळ असते. याचा रंग नारिंगी आहे. हे चक्र जलतत्त्वाचे कारक आहे. प्रवाहिता हा याचा सूक्ष्म गुणधर्म असून, रस हा याचा मूळ गुण आहे. या चक्रामुळे शरीरातील प्रजननसंस्था कार्यरत राहते. या चक्राच्या ठिकाणी असलेल्या जलतत्त्वाचा स्पंदनमंत्र ‘ॐ वं’ आहे. या नादाने जलतत्त्वाची शुद्धी होते.

आपल्या शरीरातील शुक्र, रक्त, लाळ, मूत्र व स्वेद हे जलतत्त्वाच्या अधीन आहेत.

प्रत्येक व्यक्तीतील स्वचे अधिष्ठान येथे असते. या चक्राचे मूलाधार चक्रावर अधिपत्य असते. नवनिर्मितीचे कार्य स्वाधिष्ठान चक्राच्या अधिपत्याखाली येते.

स्वाधिष्ठान चक्र हे कामभावनेच्या स्फूर्तीचे केंद्र आहे. तसेच मानसिक विकासासाठीचे महत्त्वपूर्ण चक्र आहे. ज्याचे स्वाधिष्ठान चक्र सक्षम असते ती व्यक्ती मनमिळाऊ, प्रेमळ व कल्पक असते.

ज्यावेळी स्वाधिष्ठान चक्राच्या कार्यकारीणीमध्ये दोष उत्पन्न होतात. तेव्हा,

लैंगिक दोष, नपुंसकता, प्रोस्ट्रेट ग्रंथींची वाढ, जननेंद्रीयांचे विकार, मूत्राशयाचे विकार, क्रॉनिक किडणी डिसीज, किडणी स्टोन, मासिक पाळीचे त्रास, पी.सी.ओ.डी., गर्भधारणा व प्रसुतीतील अडथळे इ. शारीरिक व्याधी उद्भवू शकतात.

तसेच,

मतिमंदत्व, कामवासनांवर नियंत्रण नसणे, संशयी व शंकेखोर स्वभाव अशा मानसिक व्याधी उद्भवू शकतात.

स्वयंपूर्ण उपचारांद्वारे स्वाधिष्ठान चक्रातील दोषनिवारण करून ते सबल व संतुलित केले जाते, ज्यामुळे वरील सर्व आजारांचे निर्मुलन केले जाऊ शकते.

हि पोस्ट English (इंग्लिश) मध्ये उपलब्ध आहे