संपर्क : 020-67475050 | ई-मेल : niraamaywellness@gmail.com

विशुद्ध / कंठ चक्र 

विशुद्ध / कंठ चक्र 

Throat Chakra

विशुद्ध चक्र कंठस्थानी असते. याचा रंग निळा आहे. हे चक्र आकाशतत्त्वाचे कारक आहे. आकारमान हा याचा सूक्ष्म गुणधर्म असून, शब्द हा याचा मूळ गुण आहे. या चक्राच्या ठिकाणी असलेल्या आकाशतत्त्वाचा स्पंदनमंत्र ‘ॐ हं’ आहे. या नादाने आकाशतत्त्वाचे संतुलन होते.

आपल्या शरीरातील काम, क्रोध, लोभ, मोह व भय हे आकाशतत्त्वाच्या अधीन आहेत.

घशातील सप्तपथ, श्वासनलिका, थायरॉईड व थायमस ग्रंथी यांवर नियंत्रण ठेवणे हे याचे प्रमुख कार्य आहे.

विशुद्ध चक्र हे उच्च निर्मितीचे केंद्र आहे. अध्ययन, नियोजय, कलात्मकता हे याचे गुण आहेत. ज्याचे विशुद्ध चक्र सक्षम असते ती व्यक्ती कलाकार, यशस्वी राजकारणी व व्यावसायिक उद्योजक होऊ शकते.

ज्यावेळी विशुद्ध चक्राच्या कार्यकारीणीमध्ये दोष उत्पन्न होतात. तेव्हा,

घशाचे विकार, स्वरयंत्रातील दोष, लॅरेंजायटिस, टॉन्सिलायटिस, माऊथ अल्सर, गॉईटर, थायरॉईड व पॅरा थायरॉईड ग्रंथींमधील दोष, दमा तसेच लिंफॅटिक सिस्टिममधील दोष इ. शारीरिक व्याधी उद्भवू शकतात.

तसेच,

अकारण चिंता करण्याचा स्वभाव, चिडचिड, अपराधीपणाची भावना, संभ्रमावस्था अशा मानसिक व्याधी उद्भवू शकतात.

स्वयंपूर्ण उपचारांद्वारे विशुद्ध चक्रातील दोषनिवारण करून ते सबल व संतुलित केले जाते, ज्यामुळे वरील सर्व आजारांचे निर्मुलन केले जाऊ शकते.

हि पोस्ट English (इंग्लिश) मध्ये उपलब्ध आहे