संपर्क : 020-67475050 | ई-मेल : niraamaywellness@gmail.com

मूलाधार चक्र

मूलाधार चक्र

a

Root Chakra

मूलाधार चक्र मेरूदंडाच्या तळाशी असते. याचा रंग लाल आहे. हे शरीरातील आधार चक्र असून, पृथ्वीतत्त्वाचे कारक आहे. स्थिरता हा याचा सूक्ष्म गुणधर्म असून, गंध हा याचा मूळ गुण आहे. या चक्रामुळे शरीरातील चेतासंस्था कार्यरत राहते. या चक्राच्या ठिकाणी असलेल्या पृथ्वीतत्त्वाचा स्पंदनमंत्र ‘ॐ लं’ आहे. या नादाने पृथ्वीतत्त्वाची शुद्धी होते.

आपल्या शरीरातील अस्थी, मांस, त्वचा, नाडी व रोम हे पृथ्वीतत्त्वाच्या अधीन आहेत.

रक्तोत्पादन व रक्ताची गुणवत्ता राखण्याचे महत्त्वाचे कार्य मूलाधार चक्राच्या अधिपत्याखाली येते. तसेच मूत्रपिंडावरील अ‍ॅड्रीनल ग्रंथीवरही या चक्राचा ताबा असतो. मूलाधार चक्र हे अंतःस्फूर्तीचे केंद्र आहे. शारीरिक व मानसिक कार्यक्षमता या चक्रावर अवलंबून असते. ज्याचे मूलाधार चक्र सक्षम असते ती व्यक्ती निर्णयक्षम व व्यवहारी असते.

ज्यावेळी मूलाधार चक्राच्या कार्यकारीणीमध्ये दोष उत्पन्न होतात. तेव्हा,

पाठ-कंबर-गुडघेदुखी, सांधेदुखी, संधीवात, आमवात, सायटीका, स्नायू आखडणे, सांधे निखळणे, पाठीची दुखणी, स्पॉन्डीलायटिस, स्लिप डीस्क, बाम्बू स्पाईन, खांदेदुखी, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो, टाचदुखी, अशक्तपणा, रक्ताचा कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार, उंची खुंटणे, प्रतिकारशक्ती कमी होणे इ. शारीरिक व्याधी उद्भवू शकतात.

तसेच, नैराश्य, आत्मघातकी प्रवृत्ती, चुळबुळा स्वभाव, निर्णयक्षमतेचा अभाव, निद्रानाश, अव्यवहारी वृत्ती तसेच ठरवलेल्या गोष्टींची अंमलबजावणी न करता येणे अशा मानसिक व्याधी उद्भवू शकतात.

स्वयंपूर्ण उपचारांद्वारे मूलाधार चक्रातील दोषनिवारण करून ते सबल व संतुलित केले जाते, ज्यामुळे वरील सर्व आजारांचे निर्मुलन केले जाऊ शकते.

हि पोस्ट English (इंग्लिश) मध्ये उपलब्ध आहे