संपर्क : 020-67475050 | ई-मेल : niraamaywellness@gmail.com

मणिपूर / नाभी चक्र

मणिपूर / नाभी चक्र

Navel Chakra

मणिपूर चक्र नाभी म्हणजेच बेंबीवर असते. याचा रंग नारिंगी पिवळा आहे. हे चक्र अग्नितत्त्वाचे कारक आहे. उष्णता हा याचा सूक्ष्म गुणधर्म असून, रूप किंवा दृष्टी हा याचा मूळ गुण आहे. या चक्रामुळे शरीरातील पचनसंस्था कार्यरत राहते. या चक्राच्या ठिकाणी असलेल्या अग्नितत्त्वाचा बीजमंत्र ‘ॐ रं’ आहे. या नादाने अग्नितत्त्वाची वृद्धी होते.

आपल्या शरीरातील क्षुधा, तृष्णा, आळस, निद्रा व मैथुन हे अग्नितत्त्वाच्या अधीन आहेत.

अन्नाचे पचन, शोषण, रसोत्पादन, मल उत्सर्जन तसेच प्रजोत्पादन, श्वासोच्छ्वास, रुधिराभिसरण ही महत्त्वाची कार्ये मणिपूर चक्राच्या अधिपत्याखाली येतात. खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर आवश्यक ऊर्जेत करण्याचे कार्य मणिपूर चक्र करते.

मणिपूर चक्र हे जाणिवांचे केंद्र आहे. परिस्थितीनुरूप वर्तन हा याचा गुण आहे. ज्याचे मणिपूर चक्र सक्षम असते ती व्यक्ती कर्तृत्ववान असते.

ज्यावेळी मणिपूर चक्राच्या कार्यकारीणीमध्ये दोष उत्पन्न होतात. तेव्हा,

पचनाचे विकार, उलट्या व अतिसार, बद्धकोष्ठता, यकृत किंवा लिव्हरचे दोष, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरॉसिस, पित्त, पित्ताशयातील खडे, अल्सरेटीव्ह कोलायटीस, मूळव्याध, अपेंडिसायटिस, कावीळ, रक्ताभिसरणातील दोष, आय.बी.एस., मधुमेह, अल्सर, अन्नपदार्थांची अ‍ॅलर्जी, हर्नीया इ. शारीरिक व्याधी उद्भवू शकतात.

तसेच,

चैतन्याचा अभाव, गोंधळलेपणा अशा मानसिक व्याधी उद्भवू शकतात.

स्वयंपूर्ण उपचारांद्वारे मणिपूर चक्रातील दोषनिवारण करून ते सबल व संतुलित केले जाते, ज्यामुळे वरील सर्व आजारांचे निर्मुलन केले जाऊ शकते.

हि पोस्ट English (इंग्लिश) मध्ये उपलब्ध आहे