संपर्क : 020-67475050 | ई-मेल : niraamaywellness@gmail.com

आज्ञा चक्र

आज्ञा चक्र

Third Eye Chakra

आज्ञा चक्र भ्रूमध्य म्हणजेच दोन्ही भुवयांच्या मध्ये असते. मानसशक्ती, इच्छाशक्तीचे हे केंद्र आहे. याचा रंग फिक्कट जांभळा आहे.

आज्ञा चक्राकडे मेंदू, डोळे व कान यांचे नियंत्रण असते. मेंदूतील पिच्युटरी ग्रंथी, एण्डोक्राइन ग्रंथींचे नियंत्रण, तसेच सर्व प्रमुख चक्रांचे नियंत्रण या चक्राकडे असते. माणसाचे विचार हे आज्ञा चक्रावर अवलंबून असतात.

आज्ञा चक्र हे मनःप्रेरणेचे केंद्र आहे. प्रबळ इच्छाशक्ती हा याचा गुण आहे. ज्याचे आज्ञा चक्र सक्षम असते ती व्यक्ती दृढ निश्चयी, कणखर, ठरवलेल्या गोष्टी तडीस नेणारी असते.

ज्यावेळी आज्ञा चक्राच्या कार्यकारीणीमध्ये दोष उत्पन्न होतात. तेव्हा,

कॅन्सर, पार्किन्सन्स, सेरेब्रल पाल्सी, मोटर न्यूरॉन डिसिज, मल्टीपल स्क्लेरॉसीस , मेनिंजायटिस, फिटस्, कोमा, गतीमंदत्व, पक्षाघात, अल्झायमर, डिमेन्शीया, ऑटीझम, स्मृतीभ्रंश, कंपवात, तोतरेपणा तसेच मोतीबिंदू, काचबिंदू, मॅक्यूला डिजनरेशन, रेटीनोपॅथी, बहिरेपणा, टीनिटस, कानाच्या पडद्यातील दोष, व्हर्टिगो इ. शारीरिक व्याधी उद्भवू शकतात.

तसेच,

मानसिक ताणतणाव, चिडचिड, नैराश्य, निरूत्साह अशा मानसिक व्याधी उद्भवू शकतात.

स्वयंपूर्ण उपचारांद्वारे आज्ञा चक्रातील दोषनिवारण करून ते सबल व संतुलित केले जाते, ज्यामुळे वरील सर्व आजारांचे निर्मुलन केले जाऊ शकते.

हि पोस्ट English (इंग्लिश) मध्ये उपलब्ध आहे