संपर्क : 020-67475050 | ई-मेल : niraamaywellness@gmail.com

योगशास्त्राचे महत्त्व

प्राचीन शास्त्रांपैकी योगशास्त्र हे एक विवेकपूर्ण शास्त्र आहे. ज्यामुळे अशांत मन शांत होऊ शकते. शारीरिक व मानसिक ऊर्जेचा उत्तम उपयोग करून शरीरात व मनात लवचिकता आणता येते. संपूर्ण व्यक्तित्व विकास हेच योगशास्त्राचे मुख्य लक्ष्य आहे.

‘युज’ या संस्कृत शब्दापासून ‘योग’ हा शब्द तयार झाला आहे. युज म्हणजे एकत्र करणे किंवा एकत्र आणणे. योगशास्त्रामध्ये शारीरिक आणि मानसिक ऊर्जा योग्य स्तरावर आणण्याचे अनेक विधी आहेत. योगामुळे शारीरिक व मानसिक उत्कर्ष साधता येतो. ही एक मनोदैहिक चिकित्सापद्धती आहे.

यम, नियम, आसन, प्राणायाम हे यातील प्रथम चरण असून हे बाह्यांगासाठी म्हणजेच शारीरिक स्वास्थ्यासाठी आहेत, तर द्वितीय चरण प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी हे अंतरंगासाठी म्हणजे मनःस्वास्थ्यासाठी आहेत.

शारीरिक स्वास्थ्यासाठी आसन, मुद्रा व प्राणायाम याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो.

आसनामुळे शरीरातील विविध स्नायू सशक्त बनतात. प्राणायामामुळे शरीर शुद्ध व स्वस्थ राहण्यास मदत होते. माणसाच्या मनोभावनात्मक अस्तित्वावर नियंत्रण ठेवून ते उत्तमरीत्या कार्यरत राहते. मुद्रांमुळे ग्रंथी व अंतरंग यांना पुनर्जीवित करता येते. ब्रह्मांडीय ऊर्जा किंवा चैतन्यशक्ती ही शरीरास चेतना प्रदान करते. दीर्घ श्‍वसनामुळे ही चेतना सर्व शरीरभर योग्य रीत्या पसरविण्यास मदत होते. आपण श्‍वास घेतो तेव्हा आपण ऑक्सिजन घेतो व उच्छ्वासावाटे कार्बनडायऑक्साईड सोडतो. यातील ऑक्सीकरणाच्या क्रियेमुळे शरीर शुद्ध, हलके व सक्रिय बनते. दीर्घ श्‍वसनामुळे या ऑक्सीकरणात वाढ होते.

ध्यान केल्याने इच्छाशक्ती विकसीत होऊन मनातील चुकीचे विचार, भीती यांपासून आपण मुक्त राहू शकतो. तसेच मानसिक ऊर्जेचे सबलीकरणही करू शकतो. यामुळे शरीरातील स्पंदने लयबद्ध होतात अन् शरीर व मन शांत होण्यास मदत होते. या सगळ्याचा अंतर्भाव स्वयंपूर्ण उपचारांमध्ये करण्यात आलेला आहे.

आणि नैसर्गिकरीत्या पाळी आली - सौ. पूर्वा फुलंब्रीकर

मला साधारण 19 वर्षांपासूनच पिरिअडस्चा (पाळीचा) त्रास सुरू झाला होता. आज माझं वय 34 आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून मला कधीही नैसर्गिकरीत्या पाळी आली नव्हती. माझ्या दोन्ही ओव्हरीज निकामी झाल्याने त्या काढून टाकण्याचा सल्लाही डॉक्टरांनी मला दिला होता. यासाठी मागील अनेक वर्षांपासून विविध प्रकारची औषधं घेत आहे, परंतु कोणताही सकारात्मक प्रतिसाद मला मिळाला नाही.

एक दिवस साम टीव्ही मराठीवर डॉ. चांदोरकर यांची मुलाखत पाहिली आणि एक शेवटचा उपाय म्हणून मी हा मार्ग अवलंबण्याचे ठरविले. डॉ. अमृता चांदोरकर यांनी माझी पहिली ट्रीटमेंट केली. उपचार चालू असतानाच तिसर्‍या महिन्याच्या शेवटी मला नैसर्गिक रीत्या पाळी आली. यामुळे मी आश्‍चर्यचकित झाले आणि दुसरीकडे समाधानही वाटले. गेल्या अनेक वर्षांत एक ‘एम.डी स्पेशालिस्ट’ डॉक्टर जे करू शकले नाहीत, ते डॉ. चांदोरकर यांनी काही महिन्यात करून दाखविले, तेही कोणत्याही औषधाविना.

डॉ. चांदोरकर व संपूर्ण ‘निरामय’ची मी अत्यंत आभारी आहे.

हि पोस्ट English (इंग्लिश) मध्ये उपलब्ध आहे


अल्झायमरवरही होऊ शकतो उपचार...

World Alzheimer's Day - Monday, 21 September
विना औषध, विना स्पर्श दिल्या जाणाऱ्या ऊर्जा उपचार
READ FULL ARTICLE