संपर्क : 020-67475050 | ई-मेल : niraamaywellness@gmail.com

विनाऔषध | विनास्पर्श

स्वयंपूर्ण उपचारांची उत्पत्ती ही निसर्गोपचार व योगशास्त्रातून झालेली आहे. या उपचारामध्ये वैश्विक ऊर्जा वापरून रुग्णाच्या शरीरातील ऊर्जा संतुलित केली जाते. विनाऔषध विनास्पर्ष असे हे उपचार आहेत. या उपचारांद्वारे रुग्णाच्या सूक्ष्म देहातील सप्त चक्रे व पंचतत्वे यातील दोषांचे निवारण केले जाते.

सूक्ष्म देहामध्ये दोष निर्माण होण्याची करणे

ज्याप्रमाणे आपण श्वास घेतो व उच्छ्वास सोडतो. त्याचप्रमाणे आपल्या सूक्ष्म शरीरातील ऊर्जावाहिनी नाड्या या वातावरणातून वैश्विक ऊर्जा घेत असतात व वापरून झालेली ऊर्जा बाहेर उत्सर्जित करत असतात. जेव्हा अधिक शारीरिक कष्ट होतात, तेव्हा स्नायूंना अधिक प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता भासते. ही वाढलेली गरज भागविण्याचे काम नाड्या व चक्रे करतात. त्याचप्रमाणे वापरून झालेली ऊर्जा अधिक प्रमाणात बाहेर टाकावी लागते. जसे खूप धावपळ झाली की श्वास लागतो, छातीवर ताण येतो. तसेच ऊर्जेची निर्माण झालेली वाढीव गरज भागविताना चक्रावर ताण येतो. मनात येणार्‍या नकारात्मक, तणावग्रस्त भावनाही आपली ऊर्जा शाषून घेतात व शरीरात ऊर्जेची कमतरता निर्माण होते. असे सततच होत राहिले तर ऊर्जावाहिनी नाड्या थकू लागतात. ऊर्जा घेण्याचे व उत्सर्जनाचे प्रमाण व्यस्त होऊ लागते. आंतरिक अवयवांना ऊर्जा कमी पडू लागल्यामुळे त्यांच्या व्यवहारात दोष उत्पन्न होतात. ते हळूहळू शरीरावर दिसू लागतात.

काही वेळा सर्व रिपोर्टस् नॉर्मल असून एखादी व्यक्ती अतिशय त्रास सहन करीत असते. अशा वेळी ‘तुमचा हा मानसिक आजार आहे’ असे लेबल लावले जाते. पण ज्याचे निदान होत नाही असे आजारही ‘स्वयंपूर्ण उपचारांनी’ बरे होऊ शकतात.

सूक्ष्म देह, चक्रे व नाड्या यांवर उपचार सुरू केल्यानंतर हळूहळू शरीराची ऊर्जेची गरज भागविणे शक्य होते. त्यामुळे शरीरही त्याच्या पूर्ण ताकदीने कार्य करू लागते. या उपचारांमुळे स्वयंव्याधिनिवारणाचा वेग वाढतो. शरीराची रोगप्रतिकारक्षमता वाढते व मन सकारात्मक बनते. कोणताही आजार मुळापासून नष्ट होऊ शकतो.

लंग्ज फायब्रोसीस बरा झाला - सौ. कुसूम शेट्टी

ऑगस्ट 2011 मध्ये माझ्या हीपबोनला फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याचे ऑपरेशन केले. त्यानंतर मला खोकला व दम लागू लागला. डॉक्टरांना दाखवले. त्यांनी त्यावर अस्थम्यासाठी औषधं सुरू केली. ती औषधं काही काळ घेतली पण फरक पडला नाही. दुसर्‍या एका डॉक्टरांना दाखविले, त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व तपासण्या केल्या, त्यामध्ये असे कळले की, अस्थमा नसून लंग्ज फायब्रोसीस हा आजार झाला आहे. त्यावर औषधं सुरू झाली. हे चालू असतानाच सप्टेंबर 2012 मध्ये डॉ. चांदोरकर यांची मुलाखत पाहिली. त्यांच्या उपचार प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती मिळवून त्यांची भेट घेतली.

मी त्यांची ट्रीटमेंट सुरू केली, दिवसातून तीन वेळा ही ट्रीटमेंट होती. हळूहळू मला फरक जाणवू लागला. तीन महिने सलग ट्रीटमेंट घेतल्याने पुन्हा केलेल्या तपासण्यांध्ये फरक दिसला. त्यानंतर मी तीन महिन्यांसाठी दुबईला गेले. तिथूनही फोनवरून ट्रीटमेंट चालू होती. मी आता पूर्णपणे बरी आहे. ही अत्यंत प्रभावी उपचारपद्धती असून याचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा. …..

हि पोस्ट English (इंग्लिश) मध्ये उपलब्ध आहे