संपर्क : 020-67475050 | ई-मेल : niraamaywellness@gmail.com

उपचार घेण्याची पद्धत

उपचार घेण्यासाठी प्रथम रुग्णाने सेंटरमध्ये येणे आवश्यक असते. जर सेंटरमध्ये येण्याची रुग्णाची शारीरिक क्षमता नसेल तर रुग्णाचा सध्याचा फोटो घेऊन नातेवाईक डॉक्टरांची भेट घेऊ शकतात. येणे शक्य नसल्यास रुग्णाची माहिती ईमेल अथवा कुरियर द्वारे पाठवता येते. निरामय सेंटरमध्ये आल्यानंतर रुग्णाला होणार्‍या त्रासांविषयक एक फॉर्म भरून द्यावा लागतो. ज्यामध्ये रुग्णाचा आरोग्यविषयक पूर्व इतिहास व सध्या होणार्‍या त्रासांविषयीची संपूर्ण माहिती भरून घेतली जाते. त्यानंतर डॉक्टर स्वतः रुग्णाशी किंवा त्याच्या नातेवाइकांशी चर्चा करतात. आवश्यकतेप्रमाणे समुपदेशन केले जाते. ज्यामुळे शरीर व मनाचे शिथिलीकरण होते व रुग्णाची ग्रहणशीलता वाढते. तसेच त्याच्या मनाचे सबलीकरणही होते. मन सकारात्मक बनल्यामुळे व्याधिनिवारणाचा वेग वाढतो.

त्यानंतर रुग्णाच्या ऊर्जादेहाचे/सूक्ष्म देहाचे व त्यावरील चक्रांचे परीक्षण करून कुठे-कुठे दोष उत्पन्न झाले आहेत, ते शोधले जाते. ज्या नाड्यांमध्ये व चक्रांमध्ये दूषित ऊर्जा साठलेली असते, ती काढून टाकण्याची प्रक्रिया त्या दिवसापासून सुरू होते. हे उपचार घेतेवेळी रुग्णाने शांत, ध्यानस्थ बसल्यास जास्त चांगला उपयोग होतो. उपचारांचे वेळी संपूर्ण शरीर शिथिल सोडण्यास आणि सावकाश व दीर्घ श्वसन करण्यास सांगितले जाते. श्वास एका लयीत आल्यामुळे संपूर्ण शरीराची कार्यप्रणाली एका लयीत कार्य करू लागते. ज्यामुळे रुग्णाच्या सूक्ष्म देहामध्ये निर्माण झालेला गुंता सोडविण्यास, दोष काढून टाकण्यास उपचारकास मदत होते. वर्षानुवर्षांचे दोष एकाच बैठकीत निघून जातील असे नाही. यासाठी अनेक बैठका लागू शकतात. किती? ते रोगाची पाळंमुळं किती खोल गेली आहेत, यावर अवलंबून असते. सूक्ष्म देहामध्ये निर्माण झालेल्या दोषांमुळे ब्रह्मांडीय ऊर्जा अनेक अंतर्गत अवयवांना व ग्रंथींना पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही. त्यामुळे हे अवयव पूर्ण क्षमतेने कार्य करू शकत नाहीत किंवा अजिबातच कार्य करत नाहीत. अशा अवयवांना व त्यांच्याशी संलग्न चक्रांना ही वैश्विक ऊर्जा उपचारांच्या माध्यमातून पुरविली जाते. ज्यामुळे हे अवयव हळूहळू पूर्ववत् होऊ लागतात. अंतर्गत अवयव, चक्रे, नाड्या, सूक्ष्म देह यांस उपचारक आपल्या हाताने स्पर्श करू शकतो. हा स्पर्श शारीरिक स्पर्श नसून सूक्ष्म ऊर्जालहरींचा स्पर्श असतो. यामुळे ऊर्जेचा प्रवाह कुठे कमी, कुठे जास्त व कुठे अडला आहे इत्यादी उपचारकास समजते व त्यानुसार उपचार केले जातात. या उपचारांमध्ये रुग्णाच्या शरीरास स्पर्श करण्याची आवश्यकता नसते.

गरजेप्रमाणे आहारातील बदल, व्यायाम, मुद्रा करण्यास सांगितले जाते व पुढील उपचार दूरस्थ माध्यमातून फोनवरून दिले जातात. 15 दिवसांनी किंवा 1 महिन्याने फॉलोअपसाठी बोलावले जाते.

या कालावधीमध्ये शारीरिक व मानसिक स्थितीत झालेल्या बदलांचा आढावा घेऊन पुढील उपचारांची दिशा निश्चित केली जाते. उपचारांमधील सातत्य व मनाची सकारात्मकता आपणास निश्चितपणे निरोगी करू शकते. नियमित उपचारांमुळे त्रासाची तीव्रता हळूहळू कमी होत जाते. जसजसा आजार कमी होत जातो, तसतशी ट्रीटमेंटही कमी होत जाते.

या उपचारांद्वारे आळस, निरुत्साह यांसारख्या किरकोळ ते स्किझोफ्रेनिया, ओ.सी.डी. सारख्या जटिल मानसिक व्याधी तसेच सर्दीपासून ते क्षय, कॅन्सर, एड्ससारख्या दुर्धर आजारांपर्यंत कोणतेही शारीरिक आणि मानसिक आजार समूळ नष्ट होण्यास मदत होते.

हि पोस्ट English (इंग्लिश) मध्ये उपलब्ध आहे


अल्झायमरवरही होऊ शकतो उपचार...

World Alzheimer's Day - Monday, 21 September
विना औषध, विना स्पर्श दिल्या जाणाऱ्या ऊर्जा उपचार
READ FULL ARTICLE