संपर्क : 020-67475050 | ई-मेल : niraamaywellness@gmail.com

रक्ताभिसरणाचे व हृदय विकार

बायपास टळली

ऑक्टोबर 2011 मध्ये मला अंजायनाचा त्रास सुरू झाला. तातडीने इस्पितळात दाखल केले. एन्जोग्राफीमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त, चार ठिकाणी ब्लॉकेजेस असल्याचे आढळले व लगेचच बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला दिला गेला. ही शस्त्रक्रिया करण्याची माझी इच्छा व मानसिक तयारी नव्हती.  डॉ. चांदोरकरांनी माझे रिपोर्टस् पाहून ‘तुम्ही जर पूर्ण विश्रांती घेणार असाल, तर आपण लगेचच उपचार सुरू करू’ असे सांगितले. मीही कबूल झालो. हॉस्पिटलमधून घरी आलो. तेव्हा मला बोलतानाही दम लागत होता. नुसती दाढी करूनही मी दमत होतो. ट्रीटमेंट सुरू झाल्यावर 15 दिवसांतच दम थोडा कमी झाला. घरातल्या घरात वावरणे थोडे सुखकर झाले. महिन्याभरात थोडं अंतर चालणे शक्य होऊ लागले. पुढे जिना उतरणं व चढणं शक्य होऊ लागलं. हळूहळू काही तास ऑफिसला जायला सुरुवात केली. दैनंदिन व्यवहार सुरळीत होऊ लागले. स्ट्रेस टेस्टमध्येही घडणारे बदल सकारात्मक होते. 5 ते 6 महिन्यांमध्ये मला खूपच बरे वाटू लागले व मी कामावर रुजू झालो.

या दरम्यान मला स्पॉन्डिलायटीस, चक्कर येणे, डाव्या कानातून आवाज येणे, ऐकू न येणे असे त्रासही होऊ लागले. अनुक्रमे एकातून बाहेर पडल्यावर दुसरा असे हे सर्व त्रास माझ्या राशीला येऊन गेले ‘काहीही त्रास वाटला तर फोनवर सांगा. तो आपण बरा करू’ हा विश्‍वास श्री. चांदोरकरांनी दिल्यामुळे एक त्रास बरा झाल्यावर उद्भवलेला दुसरा त्रास मी त्यांना सांगत राहिलो. वेगवेगळे डॉक्टर्स नकोत, नवनवीन तपासण्या नकोत. मी पूर्ण विेश्‍वासाने उपचार चालू ठेवले. आज मी जेव्हा माझ्याप्रमाणे एकापेक्षा जास्त आजारांनी ग्रस्त रुग्ण बघतो, तेव्हा मला त्यांच्यात व माझ्यात मूलभूत फरक जाणवतो तो मनोबलाचा, सकारात्मकतेचा आणि आरोग्याचाही.

– श्री. विजय साठे

हृदयाच्या मोठ्या आजारातून बाहेर आलो - श्री. सुभाष साळवे

मार्च 2012 मध्ये मला न्यूमोनिया झाल्याचे लक्षात आले आणि या ट्रीटमेंटसाठी मला जहांगीरला अ‍ॅडमिट करण्यात आले. उपचाराच्यादरम्यान ‘टुडी इको’ व ‘डॉप्लर’च्या टेस्ट झाल्या. त्यानंतर झालेल्या ‘अ‍ॅन्जिओग्राफी’ मध्ये एक 100 टक्के व दुसरे 50 टक्के ब्लॉकेज असल्याचे कळाले. त्यावेळी ‘ईएफ’चा फॅक्टर 30-35 टक्के होता. तात्काळ कोणताही निर्णय न घेता आम्ही थोडा विचार करण्याचे ठरविले.

मित्राच्या सल्ल्याने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ‘निरामय’मध्ये माझा फोटो दाखवून उपचार सुरू करण्यात आले. दोन आठवड्यांनी मी स्वत: डॉ. चांदोरकर यांना जाऊन भेटलो. श्री. योगेश व सौ. अमृता चांदोरकर यांनी केलेल्या वर्षभराच्या उपचारानंतर ‘टुडी इको’मध्ये ‘ईएफ फॅक्टर’ 50 टक्के झाल्याचे आढळून आले आहे. आता मी दररोज 3-4 किमी चालू शकतो व माझी इतरही सर्व कामे करू शकतो.

हि पोस्ट English (इंग्लिश) मध्ये उपलब्ध आहे

Where there are problems,  There are solutions too !
Where there is fear,  There is Courage too!
Niraamay for a healthy and happy life!
Get latest updates and exclusive information straight to your email inbox 
Stay Updated
Give it a try, you can unsubscribe anytime.