संपर्क : 020-67475050 | ई-मेल : niraamaywellness@gmail.com

पंचेंद्रिय (डोळे, कान, नाक, जीभ व त्वचेचे विकार)

सोरायसिसमध्येही चांगला फरक

मागील सोळा वर्षांपासून मी सोरायसिस या आजाराने त्रस्त होतो, त्यातच भर म्हणून की काय, गेल्या वर्षभरापासून मला अधिक अस्वस्थता जाणवू लागली. यादरम्यान मी सौ. अमृता चांदोरकर यांची साम टीव्हीवर मुलाखत पाहिली व त्यांच्यावर विश्‍वास ठेवून माझ्या आजारासंदर्भाने उपचार चालू केले.

नियमितपणे उपचार घेतल्यानंतर मला समाधानकारक फरक जाणवू लागला. अस्वस्थतेचा त्रास तर काही दिवसातच बरा झाला असून सोरायसिसमध्ये 90 टक्के सुधारणा आहे. मी एकही दिवस उपचार चुकविले नाहीत आणि नियमित ‘फॉलोअप’लाही जातो आहे. या उपचारपद्धतीचा कोणताही दुष्परिणाम नाही, हे विशेष. मात्र हे करत असताना श्रद्धा आणि विश्‍वास ठेवल्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम मी अनुभवतो आहे.

– श्री. सुधीर निकम

व्हर्टिगोवर प्रभावी व परिणामकारक उपचार

ऑगस्ट 2009 पासून अचानकच मला व्हर्टीगोचा त्रास सुरू झाला. अधून-मधून डोकं जड होत होतं. पुढे-पुढे चक्कर यायला लागली व कानातून बारीक आवाज येऊ लागला. उलट्या होऊ लागल्या. पल्स रेट वाढत होता. सर्व टेस्ट झाल्या. सगळे रिपोर्टस् नॉर्मल आले. डॉक्टरांना निदान करता येईना. औषधं सुरू झाली. पण फरक पडेना – हळूहळू चक्कर वाढून तोल जाऊ लागला. कानातले आवाजही वाढले. तुमचे सर्व दुखणे मानसिक आहे असा शिक्का डॉक्टरांनी मारला. औषधं बदलली. डॉक्टर बदलले, आयुर्वेदिक/ होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतली. पण प्रॉब्लेम जागीच राहिला.

शेवटी चालणंही बंद झालं. उठून उभं राहिलं की आजूबाजूचं सगळं फिरायला लागायचं. कानातल्या आवाजामुळे तर मी अगदी बेजार झाले होते. जरा जरी मान हलवली तरी आता चक्कर येत होती. डोळे मिटले तरी गरगरत होते. माझी झोपच उडाली होती. मी मनातून झुरायला लागले होते.

विश्रांतीसाठी म्हणून जानेवारी 2010 मध्ये मी माहेरी (पुण्यात) आले. आमच्या ओळखीच्यांकडून मला स्वयंपूर्ण उपचारांबद्दल समजले. मला त्यांचा अनुभव ऐकून आशा वाटली व मी उपचार सुरू केले. पहिल्याच दिवशी मी सलग  दोन तास झोपू शकले. त्यामुळे शरीराचा ताण थोडासा कमी झाला. हळूहळू मी एकटी उभी राहू शकले. चक्कर कमी झाल्यामुळे आता मी खोलीबाहेर पडून हॉलमध्ये येऊ लागले. घरच्यांबरोबर हसू-बोलू लागले. कानातले आवाजही हळूहळू कमी होत गेले.

गेल्या सहा महिन्यात माझं अस्तित्वच विसरलेली मी, आता परत माणसांत येऊ लागले. या सर्व डेव्हलपमेंट होण्यासाठी एक महिना सलग ट्रीटमेंट घ्यावी लागली. माझ्या अनुभवावरून मी सांगू शकते की ही एक अतिशय प्रभावी उपचार पद्धत आहे.

– सौ. अनुपमा गलगली

नागिणीसारख्या आजारातही लगेच आराम पडला

ऑक्टोबर 2012 मध्ये मला ‘नागिणी’च्या आजाराने ग्रासले. पाठीवर आणि छातीवर पाण्याने भरलेल्या छोट्या पुळ्या झाल्या होत्या. कोणीतरी आपल्याला गरम सुईने टोचत असल्यासारखा त्रास होत होता. यासंबंधी आमच्या ‘फॅमिली डॉक्टरां‘शी चर्चा केल्यावर त्यांनी वैद्यकीय दृष्ट्या हतबलता दाखविली. पेनकिलर देण्याशिवाय  माझ्याकडे काहीच पर्याय नसल्याचे त्यांनी मला सांगितले.

एक आठवडा या असह्य वेदना सहन करत मी कोणत्यातरी चमत्काराच्या प्रतीक्षेत होतो. त्यावेळी माझ्या मामेबहिणीने श्री. योगेश चांदोरकर यांचे नाव सुचविले. पहिल्या ट्रीटमेंटमध्येच मला थोडा धीर आला. दोन दिवस सातत्याने ट्रीटमेंट घेतल्यावर वेदना होणे पूर्णपणे थांबल्या व तिसर्‍या दिवशी पुळ्यांच्या खपल्याही पडल्या व त्वचा स्वच्छ होऊ लागली.

श्री. चांदोरकरांनी कोणत्याही औषधाविना मला पूर्णबणे बरं केल्याने माझ्यासह माझ्या सर्व कुटुंबीयांना तसेच खुद्द ‘फॅमिली डॉक्टरां‘नाही एक चमत्कार घडल्याचाच अनुभव आला.

श्री. दिलीप पंडित, ग्रुप कॅप्टन

माऊथ अल्सर औषधाविना बरा झाला

मला बरेच वर्षांपासून तोंड येणे व अल्सरचा त्रास होत होता. जिभेला अल्सर झाल्यामुळे बोलताना, खाताना खूप त्रास व्हायचा. यावर मार्ग काढण्यासाठी अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी व आयुर्वेद अशा सर्व औषधोपचार पद्धतींची मदत घेतली, परंतु त्याने तेवढ्यापुरते बरे वाटायचे अन् काही काळाने तो आजार परत उद्भवायचा. नातलगांनी सुचविल्याप्रमाणे मी ‘निरामय‘च्या श्री. व सौ. चांदोरकर यांची भेट घेतली. अतिशय सोपी, सुटसुटीत उपचारपद्धती असल्यामुळे, उपचार घेण्याचा त्याचदिवशी निर्णय घेतला. पहिल्या पंधरा दिवसात मी 50 टक्के बरी झाले होते. नंतरच्या टप्प्यातील उपचाराने माझे दुखणे अक्षरश: नाहीसे झाले. मी कोणत्याही औषधांशिवाय ठणठणीत झाल्याचा मला आनंद आहे.

– सौ. नंदा घोलप

कर्णशूळ बरा झाला

दोन वर्षांपासून सतत सर्दी व कान वाहणे अशा तक्रारी होत्या. कान सतत वाहत असल्याने कानाच्या पडद्याला होल पडले. त्यासाठी डॉक्टरांनी कानाचे ऑपरेशन करण्यास सांगितले होते. याच दरम्यान आम्हाला निरामयबद्दल कळले. ‘बघू तर काय आहे ते!’ म्हणून आम्ही पुण्याच्या सेंटरला येऊन उपचार सुरू केले. दोन महिने सलग उपचार घेतले. पहिल्या ट्रीटमेंटपासून रिझल्ट मिळत गेले. कानाचं दुखणं खूपच कमी झालं. आम्ही इएनटी स्पेशालिस्टकडेही जाऊन आलो. त्यांनी कान तपासले व कानाच्या पडद्याला होल नसल्याचे सांगितले. त्यांना आणि आम्हाला खूपच आश्‍चर्य वाटले.

– सौ. हेमा देशमुख

बहिरेपणा दूर झाला... - सौ. हर्षदा जावडेकर
दीड वर्षांपासून मला डाव्या कानात तात्पुरता बहिरेपणाचा त्रास होत होता. ‘इएनटी’ तज्ज्ञांना दाखविले, त्यांनी ‘आडिओेमेट्री टेस्ट’ करण्यास सांगितले. तपासणीनंतर असे कळाले की, डाव्या कानातून मेंदूकडे जाणारी शीर दबली गेल्याने कानातील बहिरेपणाचा त्रास उद्भवला आहे. डॉक्टरांनी मला पूर्णपणे बरे होण्याची शक्यता 50 टक्केच असल्याचे सांगितले. नोव्हेंबर 2011 मध्ये मी वर्तमानपत्रात निरामयबद्दल वाचले होते. त्यानुसार त्यापद्धतीने उपचार घेण्याचा मी निर्णय घेतला. डॉ. योगेश चांदोरकर यांनी दिलेल्या उपचारांनी आश्‍चर्यकारक रीत्या केवळ चार दिवसांमध्येच माझा डाव्या कानातील बहिरेपणाचा त्रास पूर्णपणे बरा झाला.

हि पोस्ट English (इंग्लिश) मध्ये उपलब्ध आहे

Where there are problems,  There are solutions too !
Where there is fear,  There is Courage too!
Niraamay for a healthy and happy life!
Get latest updates and exclusive information straight to your email inbox 
Stay Updated
Give it a try, you can unsubscribe anytime.