स्वयंपूर्ण उपचारांची पद्धत

 

स्वयंपूर्ण उपचारांची पद्धत

उपचार सुरु करण्यासाठी –

  • रुग्णाने प्रत्यक्ष सेंटरला यावे
  • रुग्ण येण्याच्या स्थितीत नसल्यास त्याचा सध्याचा फोटो (चेहरा स्पष्ट दिसेल असा) व काही तपासण्या झाल्या असल्यास त्याचे रिपोर्ट्स घेऊन नातेवाईकाने यावे .
  • जर रुग्ण दूर प्रांतात राहत असेल तर इमेल द्वारे माहिती कळवावी
  • दूर प्रांतात राहत असणाऱ्या रुग्णास संगणक ज्ञान नसल्यास त्याने त्याची माहिती पोस्ट अथवा कुरियर द्वारे पाठवावी.

वरील कोणत्याही प्रकारे रुग्ण अथवा रुग्णाचा फोटो समोर आल्यानंतर उपस्थित डॉक्टर त्याचे उर्जापरीक्षण करतात. पंचतत्त्व व सप्तचक्रांमधील दोष लक्षात आल्यानंतर ते दोष नष्ट करण्यासाठी स्वयंपूर्ण उपचार दिले जातात. गरज असेल तर समुपदेशन केले जाते. ज्याप्रमाणे आधुनिक वैद्यक शास्त्रात रासायनिक(वेगवेगळे रिपोर्ट्स) परीक्षण करते. आयुर्वेदात त्रिदोष म्हणजे वात, पित्त, कफाचे परीक्षण केले जाते. त्याचप्रमाणे स्वयंपूर्ण उपचारांमध्ये पंचतत्व म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश याचे परीक्षण केले जाते व त्यानुसार उपचार ठरतात. पुढील उपचार फोन वरून दूरस्थ पद्धतीने घेता येतात. रुग्णाची उर्जेची गरज पाहून त्यानुसार दिवसातून कितीवेळा उपचार घ्यायचे हे डॉक्टर ठरवतात. १५ दिवसांनी किंवा १ महिन्यांनी घडलेल्या बदलाचा आढावा घेण्यासाठी व पुढील उपचारांची पद्धत ठरविण्यासाठी डॉक्टरांची पुन्हा भेट घेणे आवश्यक असते.

इमेल किंवा पत्राद्वारे संपर्क केलेल्या रुग्णांचे देखील परीक्षण करून त्यांचे उपचार ठरविले जातात. सेंटर मधून त्यांनी दिलेल्या नंबरवर फोन करून उपचारांची संपूर्ण माहिती दिली जाते. १५ दिवसांनी किंवा १ महिन्यांनी घडलेल्या बदलाचा आढावा फोनवर देणे आवश्यक असते.

 
 

 

 

दूरस्थ उपचार

दूरस्थ उपचार घेण्यासाठी सेंटर मध्ये फोन करावा लागतो. पेशंटचा नंबर व नाव सांगितल्यानंतर उपचारासाठी बसण्यास सांगितले जाते. सेंटर मध्ये उपचारकांची एक मोठी टीम सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत 365 दिवस कार्यरत असते. डॉक्टरांनी नमूद केल्या प्रमाणे रुग्णास उपचार देण्याचे काम येथे अथक सुरु असते.

दूरस्थ उपचार कसे कार्य करतात?

हे कसे शक्य होते, ते आपण समजून घेऊ. पेशंट कुठेतरी, डॉक्टर कुठेतरी आणि फक्त 5 ते 10 मिनिटं शांत बसून शारीरिक व मानसिक व्याधीतून मुक्ती कशी मिळू शकते? याचं उत्तर शोधण्यासाठी याचे शास्त्र समजून घेऊ.

आज आपण मोबाइलवर बोलतो. मोबाइलवर नंबर डायल केला की क्षणार्धात तो तुम्हाला जगाच्या पाठीवर कोठेही संपर्क करून देऊ शकतो. हे कसे घडते? वातावरणातील ध्वनिलहरींचे (टेलिकम्युनिकेशन) सॅटेलाईट द्वारे प्रक्षेपण होऊन ही प्रणाली कार्यान्वित होते व काही सेकंदात जगात कोठेही संपर्क साधता येतो. असेच या उपचारपद्धतीतही घडते. पृथ्वीवरील प्रत्येक जीव हा नैसर्गिकरीत्या युनिव्हर्सल कनेक्टिव्हिटीद्वारे एकमेकाशी संलग्न आहे. जसे आपण गुरुत्वाकर्षणामुळे जमिनीशी बांधलेले आहोत, तसेच युनिव्हर्सल कनेक्टिव्हिटीमुळे एकमेकांशी बांधलेले आहोत. या कनेक्टिव्हिटीमार्फत हे उपचार केले जातात. यासाठी उपचार घेणाऱ्याच्या परवानगीची आवश्यकता असते व त्यासाठी त्याने फोन करणे गरजेचे असते.