सप्तचक्र

 

सप्तचक्र

शरीरातील प्रमुख चक्रे

मूलाधार चक्र

मूलाधार चक्र मेरूदंडाच्या तळाशी असते. याचा रंग लाल आहे. हे शरीरातील आधार चक्र असून, पृथ्वीतत्त्वाचे कारक आहे. स्थिरता हा याचा सूक्ष्म गुणधर्म असून, गंध हा याचा मूळ गुण आहे. या चक्रामुळे शरीरातील चेतासंस्था कार्यरत राहते.

या चक्राच्या ठिकाणी असलेल्या पृथ्वीतत्त्वाचा स्पंदनमंत्र ‘ॐ लं’ आहे. या नादाने पृथ्वीतत्त्वाची शुद्धी होते.

शरीरातील अस्थी, मांस, त्वचा, नाडी व रोम हे पृथ्वीतत्त्वाच्या अधीन आहेत. रक्तोत्पादन व रक्ताची गुणवत्ता राखण्याचे महत्त्वाचे कार्य मूलाधार चक्राच्या अधिपत्याखाली येते. तसेच मूत्रपिंडावरील अॅड्रीनल ग्रंथीवरही या चक्राचा ताबा असतो. मूलाधार चक्र हे अंतःस्फूर्तीचे केंद्र आहे. शारीरिक व मानसिक कार्यक्षमता या चक्रावर अवलंबून असते. ज्याचे मूलाधार चक्र सक्षम असते ती व्यक्ती निर्णयक्षम व व्यवहारी असते.

ज्यावेळी मूलाधार चक्राच्या कार्यकारीणीमध्ये दोष उत्पन्न होतात, तेव्हा पाठ-कंबर-गुडघेदुखी, सांधेदुखी, संधीवात, आमवात, स्नायू आखडणे, सायटीका, सांधे निखळणे, पाठीची दुखणी, स्पॉन्डीलायटिस, खांदेदुखी, स्लिप डीस्क, बाम्बू स्पाईन, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो, टाचदुखी, अशक्तपणा, मूत्रपिंडाचे आजार, उंची खुंटणे, प्रतिकारशक्ती कमी होणे, रक्ताचा कर्करोग इ. शारीरिक व्याधी उद्भवू शकतात.

तसेच नैराश्य, आत्मघातकी प्रवृत्ती, चुळबुळा स्वभाव, निर्णयक्षमतेचा अभाव, निद्रानाश, ठरवलेल्या गोष्टींची अंमलबजावणी न करता येणे तसेच अव्यवहारी वृत्ती अशा मानसिक व्याधी उद्भवू शकतात.

स्वयंपूर्ण उपचारांद्वारे मूलाधार चक्रातील दोषनिवारण करून ते सबल व संतुलित केले जाते, ज्यामुळे वरील आजारांचे निर्मुलन केले जाऊ शकते.

स्वाधिष्ठान चक्र

स्वाधिष्ठान चक्र लिंगस्थानाजवळ असते. याचा रंग नारिंगी आहे. हे चक्र जलतत्त्वाचे कारक आहे. प्रवाहिता हा याचा सूक्ष्म गुणधर्म असून, रस हा याचा मूळ गुण आहे. या चक्रामुळे शरीरातील प्रजननसंस्था कार्यरत राहते. या चक्राचे मूलाधार चक्रावर अधिपत्य असते.

या चक्राच्या ठिकाणी असलेल्या जलतत्त्वाचा स्पंदनमंत्र ‘ॐ वं’ आहे. या नादाने जलतत्त्वाची शुद्धी होते.

आपल्या शरीरातील शुक्र, रक्त, लाळ, मूत्र व स्वेद हे जलतत्त्वाच्या अधीन आहेत. प्रत्येक व्यक्तीतील स्वचे अधिष्ठान येथे असते. स्वाधिष्ठान चक्र हे कामभावनेच्या स्फूर्तीचे केंद्र आहे. नवनिर्मितीचे कार्य स्वाधिष्ठान चक्राच्या अधिपत्याखाली येते. मानसिक विकासासाठी हे महत्त्वपूर्ण चक्र आहे. ज्याचे स्वाधिष्ठान चक्र सक्षम असते ती व्यक्ती मनमिळाऊ, प्रेमळ व कल्पक असते.

ज्यावेळी स्वाधिष्ठान चक्राच्या कार्यकारीणीमध्ये दोष उत्पन्न होतात. तेव्हा, लैंगिक दोष, नपुंसकता, प्रोस्ट्रेट ग्रंथींची वाढ, जननेंद्रीयांचे विकार, मूत्राशयाचे विकार, क्रॉनिक किडणी डिसीज, किडणी स्टोन, मासिकपाळीचे त्रास, पी.सी.ओ.डी., गर्भधारणा/प्रसुतीतील अडथळे इ. शारीरिक व्याधी उद्भवू शकतात.

तसेच मतिमंदत्व, कामवासनांवर नियंत्रण नसणे, संशयी व शंकेखोर स्वभाव अशा मानसिक व्याधी उद्भवू शकतात.

स्वयंपूर्ण उपचारांद्वारे स्वाधिष्ठान चक्रातील दोषनिवारण करून ते सबल व संतुलित केले जाते, ज्यामुळे वरील आजारांचे निर्मुलन केले जाऊ शकते.

मणिपूर चक्र

मणिपूर चक्र नाभी/बेंबीवर असते. याचा रंग नारिंगी पिवळा आहे. हे चक्र अग्नितत्त्वाचे कारक आहे. उष्णता हा याचा सूक्ष्म गुणधर्म असून, रूप वा दृष्टी हा याचा मूळ गुण आहे. या चक्रामुळे शरीरातील पचनसंस्था कार्यरत राहते.

या चक्राच्या ठिकाणी असलेल्या अग्नितत्त्वाचा बीजमंत्र ‘ॐ रं’ आहे. या नादाने अग्नितत्त्वाची वृद्धी होते.

आपल्या शरीरातील क्षुधा, तृष्णा, आळस, निद्रा, मैथुन हे अग्नितत्त्वाच्या अधीन आहेत. अन्नाचे पचन, शोषण, रसोत्पादन, मल उत्सर्जन तसेच प्रजोत्पादन, श्वासोच्छ्वास, रुधिराभिसरण ही महत्त्वाची कार्ये मणिपूर चक्राच्या अधिपत्याखाली येतात. खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर आवश्यक ऊर्जेत करण्याचे कार्य मणिपूर चक्र करते. मणिपूर चक्र हे जाणिवांचे केंद्र आहे. परिस्थितीनुरूप वर्तन हा याचा गुण आहे. ज्याचे मणिपूर चक्र सक्षम असते ती व्यक्ती कर्तृत्ववान असते.

ज्यावेळी मणिपूर चक्राच्या कार्यकारीणीमध्ये दोष उत्पन्न होतात. तेव्हा पचनाचे विकार, उलट्या व अतिसार, बद्धकोष्ठता, यकृत किंवा लिव्हरचे दोष, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरॉसिस, पित्त, अल्सरेटीव्ह कोलायटीस, पित्ताशयातील खडे, मूळव्याध, अपेंडिसायटिस, कावीळ, आय.बी.एस., रक्ताभिसरणातील दोष, मधुमेह, अल्सर, अन्नपदार्थांची अॅलर्जी, हर्नीया इ. शारीरिक व्याधी उद्भवू शकतात.

तसेच चैतन्याचा अभाव, गोंधळलेपणा अशा मानसिक व्याधी उद्भवू शकतात.

स्वयंपूर्ण उपचारांद्वारे मणिपूर चक्रातील दोषनिवारण करून ते सबल व संतुलित केले जाते, ज्यामुळे वरील आजारांचे निर्मुलन केले जाऊ शकते.

अनाहत चक्र

अनाहत चक्र छातीच्या मध्यभागी म्हणजेच हृदयाजवळ असते. याचा रंग हिरवा आहे. हे चक्र वायुतत्त्वाचे कारक आहे. गतिशीलता हा याचा सूक्ष्म गुणधर्म असून, स्पर्श हा याचा मूळ गुण आहे. हृदय व फुप्फुस या छातीतील अत्यंत महत्त्वाच्या अवयवांवर या चक्राचे नियंत्रण असते.

या चक्राच्या ठिकाणी असलेल्या वायुतत्त्वाचा स्पंदनमंत्र ‘ॐ यं’ आहे. या नादाने वायुतत्त्वाचे संतुलन होते.

आपल्या शरीरातील चलन-वलन, आकुंचन, प्रसरण व निरोधन हे वायुतत्त्वाच्या अधीन आहेत. श्वासोच्छ्वास व रक्ताभिसरण ही महत्त्वाची कार्ये अनाहत चक्राच्या अधिपत्याखाली येतात. थायमस ग्रंथीवरही या चक्राचा ताबा असतो. अनाहत चक्र हे भाव-भावनांचे केंद्र आहे. याला शक्तीकेंद्रही संबोधले जाते. ज्याचे अनाहत चक्र सक्षम असते ती व्यक्ती स्वार्थ व परमार्थाचा समतोल राखू शकते.

ज्यावेळी अनाहत चक्राच्या कार्यकारीणीमध्ये दोष उत्पन्न होतात, तेव्हा हृदयविकाराचा झटका, धडधडणे, हृदयाचे अनियमीत ठोके, हृदयामध्ये भोक असणे, हृदयाचा आकार वाढणे, छातीत वेदना, जुनाट खोकला, दमा, न्युमोनिया, एम्फसिमा, श्वास कमी पडणे, क्षयरोग, फुप्फुसाचे विकार, संसर्गजन्य विकार इ. शारीरिक व्याधी उद्भवू शकतात.

तसेच स्वार्थी व निर्दयी स्वभाव, स्वयंकेंद्रित एकलकोंडा स्वभाव, लोभी वृत्ती, काल्पनिक भीती, आभास होणे, अकारण दुःख करणे अशा मानसिक व्याधी उद्भवू शकतात.

स्वयंपूर्ण उपचारांद्वारे अनाहत चक्रातील दोषनिवारण करून ते सबल व संतुलित केले जाते, ज्यामुळे वरील आजारांचे निर्मुलन केले जाऊ शकते.

विशुद्ध चक्र

विशुद्ध चक्र कंठस्थानी असते. याचा रंग निळा आहे. हे चक्र आकाश तत्त्वाचे कारक आहे. आकारमान हा याचा सूक्ष्म गुणधर्म असून, शब्द हा याचा मूळ गुण आहे.

या चक्राच्या ठिकाणी असलेल्या आकाशतत्त्वाचा स्पंदनमंत्र ‘ॐ हं’ आहे. या नादाने आकाशतत्त्वाचे संतुलन होते.

आपल्या शरीरातील काम, क्रोध, लोभ, मोह व भय हे आकाशतत्त्वाच्या अधीन आहेत. घशातील सप्तपथ, श्वासनलिका, थायरॉईड व थायमस ग्रंथी यांवर नियंत्रण ठेवणे हे याचे प्रमुख कार्य आहे. विशुद्ध चक्र हे उच्च निर्मितीचे केंद्र आहे. अध्ययन, नियोजन, कलात्मकता हे याचे गुण आहेत. ज्याचे विशुद्ध चक्र सक्षम असते ती व्यक्ती कलाकार, यशस्वी राजकारणी व व्यावसायिक उद्योजक होऊ शकते.

ज्यावेळी विशुद्ध चक्राच्या कार्यकारीणीमध्ये दोष उत्पन्न होतात. तेव्हा घशाचे विकार, स्वरयंत्रातील दोष, लॅरेंजायटिस, टॉन्सिलायटिस, माऊथ अल्सर, गॉईटर, थायरॉईड व पॅरा थायरॉईड ग्रंथींमधील दोष, दमा तसेच लिंफॅटिक सिस्टिममधील दोष इ. शारीरिक व्याधी उद्भवू शकतात.

तसेच अकारण चिंता करण्याचा स्वभाव, चिडचिड, अपराधीपणाची भावना, संभ्रमावस्था अशा मानसिक व्याधी उद्भवू शकतात.

स्वयंपूर्ण उपचारांद्वारे विशुद्ध चक्रातील दोषनिवारण करून ते सबल व संतुलित केले जाते, ज्यामुळे वरील आजारांचे निर्मुलन केले जाऊ शकते.

आज्ञा चक्र

आज्ञा चक्र भ्रूमध्य म्हणजेच दोन्ही भुवयांच्या मध्ये असते. मानसशक्ती, इच्छाशक्तीचे हे केंद्र आहे. याचा रंग फिक्कट जांभळा आहे.

आज्ञा चक्राकडे मेंदू, डोळे व कान यांचे नियंत्रण असते. मेंदूतील पिच्युटरी ग्रंथी, एण्डोक्राइन ग्रंथींचे नियंत्रण, तसेच सर्व प्रमुख चक्रांचे नियंत्रण या चक्राकडे असते.

माणसाचे विचार हे आज्ञा चक्रावर अवलंबून असतात. आज्ञा चक्र हे मनःप्रेरणेचे केंद्र आहे. प्रबळ इच्छाशक्ती हा याचा गुण आहे. ज्याचे आज्ञा चक्र सक्षम असते ती व्यक्ती दृढ निश्चयी, कणखर, ठरविलेल्या गोष्टी तडीस नेणारी असते.

ज्यावेळी आज्ञा चक्राच्या कार्यकारीणीमध्ये दोष उत्पन्न होतात, तेव्हा कॅन्सर, पार्किन्सन्स, सेरेब्रल पाल्सी, मोटर न्यूरॉन डिसिज, मल्टीपल स्न्लेरोसिस, मेनिंजायटिस, फिटस्, कोमा, गतीमंदत्व, पक्षाघात, अल्झायमर, डिमेन्शीया, ऑटीझम, मस्न्युलर डिस्ट्रॉफी, तोतरेपणा, स्मृतीभ्रंश, कंपवात, तसेच मोतीबिंदू, काचबिंदू, मॅक्यूला डिजनरेशन, रेटीनोपॅथी, बहिरेपणा, टीनिटस, कानाच्या पडद्यातील दोष, व्हर्टिगो इ. शारीरिक व्याधी उद्भवू शकतात.

तसेच मानसिक ताणतणाव, चिडचिड, नैराश्य, निरूत्साह अशा मानसिक व्याधी उद्भवू शकतात.

स्वयंपूर्ण उपचारांद्वारे आज्ञा चक्रातील दोषनिवारण करून ते सबल व संतुलित केले जाते, ज्यामुळे वरील आजारांचे निर्मुलन केले जाऊ शकते.

सहस्रार चक्र

सहस्रार चक्र ब्रह्मरंध्र म्हणजेच टाळूवर असते. हे प्राणशक्तीचे प्रवेश केंद्र आहे. याचा रंग जांभळा आहे.

सहस्रार चक्राकडे मेंदूचे नियंत्रण तसेच पिनियल ग्रंथींचे नियंत्रण असते. मूळ प्रेममय स्फुरण व ऐक्याचा भाव या चक्रामुळे येतो.

सहस्रार चक्र हे ब्रह्मजागृतीचे केंद्र असून परमात्म्याचे, परमतत्त्वाचे ज्ञान येथे होते. अनुभूती, साक्षात्कार या चक्रामुळे घडतात. हे विश्वप्रेमाचे केंद्र असून, ज्याचे सहस्रार चक्र सक्षम असते ती व्यक्ती परोपकारी, आत्मज्ञानी असते.

ज्यावेळी सहस्रार चक्राच्या कार्यकारीणीमध्ये दोष उत्पन्न होतात, तेव्हा मेंदू व पिनियल ग्रंथींशी संबंधित शारीरिक व्याधी उद्भवू शकतात.

तसेच असमाधानी वृत्ती व मनःशांतीचा अभाव अशा मानसिक व्याधी उद्भवू शकतात.

स्वयंपूर्ण उपचारांद्वारे सहस्रार चक्रातील दोषनिवारण करून ते सबल व संतुलित केले जाते, ज्यामुळे वरील आजारांचे निर्मुलन केले जाऊ शकते.

साधारणतः सर्वच रोगांमध्ये एका पेक्षा जास्त चक्रे बाधित झालेली असतात. स्वयंपूर्ण उपचारांद्वारे एकाच वेळी सर्व चक्रांवर तसेच संपूर्ण सूक्ष्म देहावर उपचार केले जातात. त्यामुळे एकाच वेळी अनेक रोग बरे होऊ शकतात. बरे होण्यास लागणारा कालावधी हा रोगाच्या जटीलतेवर, रूग्णाच्या ग्रहणशीलतेवर व उपचारांमधील सातत्यावर अवलंबून असतो.

चुकीच्या आहार, विहार व विचारांमुळे यांच्या कार्यप्रणालीत दोष निर्माण होतात, ज्यामुळे ही चक्रे व नाड्या पूर्ण क्षमतेने वातावरणातील ऊर्जा घेऊ शकत नाहीत. त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतात. स्वयंपूर्ण उपचारांद्वारे नाड्या व चक्रांमधील दोष काढून ती ऊर्जित केली जातात व शारीरिक वा मानसिक दोष समूळ नष्ट होण्यास मदत होते.