अनुभव

 

 

अनुभव

 

चिंता मिटल्या
-अनामिक प्रतिक्रिया

माझा मुलगा 28 वर्षांचा आहे. चांगला डबल ग्रॅज्युएट झालेला. 2009 पासून नोकरीच्या शोधात होता. अनेक ठिकाणी इंटरव्ह्यू दिले, पण यश आले नाही. ऑगस्ट 2011 मध्ये ताण सहन न होऊन डिप्रेशनमध्ये गेला. आम्हाला ...

Read More

‘भय’ इथले संपले!
-अनामिक प्रतिक्रिया

माझ्या आयुष्यात एक नाही, दोन नाही तर तब्बल 18 वर्षं एक समस्या घर करून होती आणि ती समस्या ‘मानसिक भीती’ची होती. सुमारे अठरा वर्षांपूर्वी मी गरोदर असताना माझी परिस्थिती जरा नाजूक होती. पती ...

Read More

मी पुन्हा नोकरी करणार
– अनामिक प्रतिक्रिया

फेब्रुवारी 2004मध्ये एका छोटेखानी अपघातात माझ्या डाव्या गुडघ्याची लिगामेंट तुटली. तीन महिन्यानंतर लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी केली. परंतु मनात नेहमी शंका-कुशंका निर्माण होतच होत्या. ...

Read More

आत्मविश्वास मिळाला
– श्री. अमोल सपकाळ

माझा स्वत:वर कधीच विश्वास नव्हता. कोणतेही कार्य करण्यासाठी माझे धाडसच होत नव्हते. मी सतत भीती आणि दडपणाखालीच वावरायचो. मनाची शक्ती आणि आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टीने मी ‘निरामय’ला ...

Read More

औषधांशिवाय गाठ नष्ट झाली
– कु. प्रगती लेले

8 ऑगस्ट 2011 ला अचानक ओटीपोटात खूप दुखायला लागले. असह्य वेदना होऊ लागल्या. सोनाग्राफी केली तर ओव्हरीमध्ये 56 बाय 59 मि.मि. आकाराचे सिस्ट (गाठ) असल्याचे निष्पन्न झाले. मी अॅलोपथीक तसेच आयुर्वेदिक ...

Read More

मूल झाले आणि निरोगीही
– सौ. सोनाली आवारे

लग्नानंतर बरीच वर्षं आम्हाला मूल होत नव्हते. मी व माझे पती यामुळे खुप चिंतित असायचो, त्यामुळे नकळत आमच्यावर मानसिक ताण यायचा. याच काळात मला ‘निरामय’बद्दल कळाले, मी लगेच त्यांची ट्रीटमेंट ...

Read More
 
 

 
 

purva

सौ. पूर्वा फुलंब्रीकर

आणि ‘अडचण’ दूर झाली

मला साधारण 19 वर्षांपासूनच पिरिअडस्चा (पाळीचा) त्रास सुरू झाला होता. आज माझं वय 34 आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून मला कधीही नैसर्गिक रीत्या पाळी आली नव्हती. माझ्या दोन्ही ओव्हरीज निकामी झाल्याने त्या काढून टाकण्याचा सल्लाही डॉक्टरांनी मला दिला होता. यासाठी मागील अनेक वर्षांपासून विविध प्रकारची औषधं घेत आहे, परंतु कोणताही सकारात्मक प्रतिसाद मला मिळाला नाही.

एक दिवस साम टीव्ही मराठीवर डॉ. चांदोरकर यांची मुलाखत पाहिली आणि एक शेवटचा उपाय म्हणून मी हा मार्ग अवलंबण्याचे ठरविले. डॉ. अमृता चांदोरकर यांनी माझी पहिली ट्रीटमेंट केली. उपचार चालू असतानाच तिसर्या महिन्याच्या शेवटी मला नैसर्गिक रीत्या पाळी आली. यामुळे मी आश्चर्यचकित झाले आणि दुसरीकडे समाधानही वाटले. गेल्या अनेक वर्षांत एक ‘एम.डी स्पेशालिस्ट’ डॉक्टर जे करू शकले नाहीत, ते डॉ. चांदोरकर यांनी काही महिन्यात करून दाखविले, तेही कोणत्याही औषधाविना.डॉ. चांदोरकर व संपूर्ण ‘निरामय’ची मी अत्यंत आभारी आहे

purva

सौ. हर्षदा जावडेकर

बहिरेपणा दूर झाला

दीड वर्षांपासून मला डाव्या कानात तात्पुरता बहिरेपणाचा त्रास होत होता. ‘इएनटी’ तज्ज्ञांना दाखविले, त्यांनी ‘ऑडिओमेट्री टेस्ट’ करण्यास सांगितले. तपासणीनंतर असे कळाले की, डाव्या कानातून मेंदूकडे जाणारी शीर दबली गेल्याने कानातील बहिरेपणाचा त्रास उद्भवला आहे. डॉक्टरांनी मला पूर्णपणे बरे होण्याची शक्यता 50 टक्केच असल्याचे सांगितले. नोव्हेंबर 2011 मध्ये मी वर्तमानपत्रात निरामयबद्दल वाचले होते. त्यानुसार त्यापद्धतीने उपचार घेण्याचा मी निर्णय घेतला. डॉ. योगेश चांदोरकर यांनी दिलेल्या उपचारांनी आश्चर्यकारक रीत्या केवळ चार दिवसांमध्येच माझा डाव्या कानातील बहिरेपणाचा त्रास पूर्णपणे बरा झाला.